Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा इतके लोक जमले की दारातदेखील त्यांना जागा होईना; तेव्हा तो त्यांना संदेश देत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तेथे इतके लोक जमले की, त्यांना दारातदेखील जागा होईना. तो त्यांना संदेश देत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 2:2
20 Iomraidhean Croise  

महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.


योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला,


आणि सबंध शहर दाराशी लोटले.


व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.”


पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.


काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.


तो तेथून निघून समुद्रकिनार्‍यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले.


येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.


इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.


एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते.


पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते;


हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे.


स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत.


आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.


नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले.


नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.


तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan