Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 13:8
21 Iomraidhean Croise  

राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे;


तेथे त्यांना कंप सुटला; त्यांना प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या


मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.


ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?


अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


दिमिष्क नगरीचा धीर सुटला आहे; ती पळून जाण्यास तयार झाली आहे; दहशतीने तिला पछाडले आहे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत.


त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत.


आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.


मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.


त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्‍याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्‍याच्या हाताशी प्रतिकार करील.


पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.


आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.


तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.


तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan