Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील, त्याचा उद्धार होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 13:13
19 Iomraidhean Croise  

जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य.


आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.


परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.


तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.


तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;


आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील;


मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.


परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.


मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.


म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;


चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्‍चर्य मानू नका.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan