Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परूशी व हेरोदी ह्यांच्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर त्यांनी त्यास चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व काही हेरोदी लोकांस त्याच्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्यांनी येशूला बोलण्यात पकडण्याकरता काही परुश्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 12:13
12 Iomraidhean Croise  

गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्ट वक्त्यासाठी जाळे पसरतात व नीतिमानास धडधडीत लबाडीने उलथून पाडतात;


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”


ते येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आपण खरे आहात व कोणाची भीडमुरवत धरत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की न द्यावा?”


मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.


मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.”


आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan