Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 11:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी ते योजना आखू लागले; कारण सर्व लोक त्याच्या प्रबोधनावरून थक्क झाल्यामुळे ते त्याला भीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 11:18
26 Iomraidhean Croise  

अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.


इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “हा माझ्यासंबंधाने अनुकूल संदेश सांगणार नाही तर प्रतिकूल सांगेल असे मी आपल्याला सांगितले नाही काय?”


इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले;


येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्‍क झाले;


त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता.


‘माणसांपासून होता’ असे म्हणावे तर? - त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत.


तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.


मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.


कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.


तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत.


त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले.


तेव्हा शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकण्याच्या विचारात होते; पण त्यांना लोकांची भीती वाटली; हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे ते समजले.


तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्‍चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?”


ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही.


मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला जिवे मारायला का पाहता?”


कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”


तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan