Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 10:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 10:14
36 Iomraidhean Croise  

मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.


त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.


त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.


ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील;


सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.


ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय;


येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”


नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.


“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, “सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.”


येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”


येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.


कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”


तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.


कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.


सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.


तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये;


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे.


त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.


इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.


‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्‍या दुधाची इच्छा धरा.


त्यांच्या ‘तोंडात असत्य आढळले नाही;’ ते [देवाच्या राजासनासमोर] निष्कलंक आहेत.


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan