Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीएक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 1:7
11 Iomraidhean Croise  

मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.


परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?”


योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे.


मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.”


आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडण्यास मी योग्य नाही, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.


जो माझ्यामागून येणारा आहे, [तो माझ्यापूर्वी होता,] त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.”


योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’


पौलाने म्हटले, “योहान पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्‍यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.”


ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली की, “आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan