Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 1:5
15 Iomraidhean Croise  

मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)


जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.


मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.


त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला.


योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे.


यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.


योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत.


तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात.


विश्वास ठेवणार्‍या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली.


पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan