Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 1:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 1:45
12 Iomraidhean Croise  

मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन.


मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.


हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले.


तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.


तो तेथून निघून समुद्रकिनार्‍यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले.


मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना.


मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला;


तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले.


तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती.


कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan