Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 1:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 1:27
15 Iomraidhean Croise  

मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला.


कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.”


त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”


तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला.


ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.


तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे!


मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला,


मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या.


तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.


आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”


तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!”


मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला;


नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हांला समजावून सांगाल काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan