Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 7:7
33 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करत आहे.


मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात; मी तर प्रार्थनेत मग्न असतो.


मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो.


तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो.


परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.


हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे; हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.


तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय?


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


“म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”


हे परमेश्वरा, तुझा मी धावा करतो, कारण रानातील कुरणे अग्नीने खाल्ली आहेत, शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.


मी आपल्या पहार्‍यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गार्‍हाण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan