Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 7:16
17 Iomraidhean Croise  

माझ्याकडे चित्त देऊन विस्मित व्हा. आपल्या तोंडाला हात लावा.


“पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो.


तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.”


तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेस, अथवा मनात दुष्कर्म योजलेस; तर तू आपल्या मुखावर हात ठेव.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो; सर्व राष्ट्रांनी व भिन्नभिन्न भाषा बोलणार्‍यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांना एकत्र करावे अशी वेळ आली आहे.


ह्या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रकट करीन, आणि बहुत राष्ट्रांना माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.


त्या दिवशी असे होईल की, यरुशलेमेवर चढाई करून येणार्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन;


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan