मीखाह 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, जो तुझ्या वतनाचा कळप आहे, जो एकटाच जंगलात, सुपीक कुरणात राहतो. त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात यथेच्छ चरू द्या. Faic an caibideil |