Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 7:13
22 Iomraidhean Croise  

माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.


म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;


तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.


दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.


त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


आणि ह्या देशाच्या लोकांना सांग की, प्रभू परमेश्वर इस्राएल देशातल्या यरुशलेमनिवासीयांविषयी म्हणतो की, ते चिंतातुर होऊन अन्न खातील, भयचकित होऊन पाणी पितील; कारण त्या देशाच्या सर्व रहिवाशांच्या दुष्टतेमुळे त्या भूमीतले सर्वकाही नष्ट करून ती ओसाड करण्यात आली आहे.


मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.


ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील.


म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan