Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 6:4
29 Iomraidhean Croise  

तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?


मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.


त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.”


तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”


तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील.


इस्राएल लोकांना मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो ह्याच्याशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन.


तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस;


मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व चाळीस वर्षे रानातून फिरवले.


मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. कारण त्याने कूशी लोकांतील स्त्री बायको करून घेतली होती.


मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे :


‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.


तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.


तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे.


तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे.


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


‘ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.


मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिसर देशातून काढून आणलेस त्याचा नाश करू नकोस.


शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्याने मोशे व अहरोन ह्यांना नेमले व तुमच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले तो परमेश्वरच होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan