Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 6:2
19 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.


तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही.


जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले;


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


परमेश्वर वाद चालवण्यास उभा आहे; राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे.


मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू; तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग.


तर आता यरुशलेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे!


म्हणून मी तुमच्याशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो.


पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’


परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.


गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan