Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 6:16
31 Iomraidhean Croise  

ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?


तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्याला असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला.


कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.


जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,


तू आम्हांला आमच्या शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस.


राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हांला केले आहेस. व आम्हांला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस.


तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्‍यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.


मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.


म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.


हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.


ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यांना धाक घालणार नाही; मग ते लज्जित होतील; माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यांना पस्तावा वाटेल.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


एफ्राइमाने क्रोध अत्यंत चेतवला आहे, त्याचा रक्तपातदोष त्याच्यावर तसाच राहील, आणि प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील.


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”


म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan