Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 6:10
21 Iomraidhean Croise  

दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.


खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.


वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे.


वजनावजनांत फरक असणे ह्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही.


असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्‍या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”


अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.”


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


मी विचारले, “हे काय आहे?” तो म्हणाला, “ही चालली आहे ती एक एफा1 आहे.” आणखी त्याने म्हटले की, “ही सर्व देशभर त्यांचे प्रतिरूप आहे.”2


इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan