Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 6:1
22 Iomraidhean Croise  

देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.


त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो :


हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


परमेश्वर वाद चालवण्यास उभा आहे; राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे.


तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, परमेश्वराचे वचन ऐक.


हे मानवपुत्रा, इस्राएलाच्या पर्वतांना संदेश देऊन सांग की, इस्राएलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.


तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका :


असे म्हण : इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर पर्वत, टेकड्या, नाले व खोरी ह्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच तुमच्यावर तलवार आणून तुमची उच्च स्थाने उद्ध्वस्त करीन.


इस्राएलवंशजहो, तुमच्याविरुद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे :


सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,


अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.


ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन.


पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.


त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप


“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


तर आता तुम्ही स्तब्ध उभे राहा म्हणजे तुम्ही व तुमचे वडील ह्यांच्या बाबतीत परमेश्वराने जी न्यायकृत्ये केली त्यांच्यासंबंधीचा वाद मी तुमच्याशी परमेश्वरासमोर चालवतो.


शमुवेल शौलाला म्हणाला, “पुरे कर; परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो.” तो म्हणाला, “सांगा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan