Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन, तू ह्यापुढे आपल्या हातांच्या कृतींच्या पाया पडणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 5:13
17 Iomraidhean Croise  

मूर्ती तर अगदी नाहीतशा होतील.


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


ते तुझी घरे अग्नीने जाळतील आणि बहुत स्त्रियांदेखत तुला शासन करतील; ह्या प्रकारे तुझी शिंदळकी मी बंद करीन, आणि ह्यापुढे तू कोणाला वेतन देणार नाहीस.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणांला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी1 पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल.


तुमच्यापैकी निभावलेले ज्या राष्ट्रांत पकडून नेले जातील त्यांत ते माझे स्मरण करतील; तेव्हा माझ्यापासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणीन; त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले, त्यामुळे ते आपणांस निंद्य मानतील.


त्यांचे हृदय बेइमान आहे, आता त्यांना प्रायश्‍चित्त मिळालेच पाहिजे; तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील; तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते.


परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”


“मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन.


त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्‍चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही;


तेव्हा देश हेरायला गेलेल्या पाच लोकांनी आत शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या. त्या वेळेस पुरोहित सहाशे सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan