Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 5:1
35 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावाच्या वाटेवर तिला पुरले.


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला, आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?”


परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.


लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.


अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.


तू अग्नीला भक्ष्य होशील; तुझे रक्त देशात पडून राहील; तुझी पुढे आठवण राहणार नाही, कारण मी परमेश्वर हे बोललो आहे.”


“मानवपुत्रा, तू ही तारीख, आजची तारीख लिहून ठेव; ह्या तारखेस बाबेलचा राजा यरुशलेमेवर जाऊन पडला आहे.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.


मी त्याच्यातल्या शास्त्यांना कापून टाकीन, व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारांना मारून टाकीन,” असे परमेश्वर म्हणतो.


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले,


ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले.


मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;


त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?”


आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या.


तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्‍यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर.


बेथलेहेम-यहूदा येथे यहूदा घराण्यातला एक तरुण लेवी उपरा म्हणून राहत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan