Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तू आता मोठ्याने का रडत आहेस— तुला राजा नाही काय? तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:9
20 Iomraidhean Croise  

ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.


हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.


प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते व वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहोत.


अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत.


पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


आता ते निश्‍चये म्हणतील, “आम्हांला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा?”


प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील; तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील.


स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही.


ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan