Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:5
19 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


तथापि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांनी आपापल्या मूर्ती बनवल्या, आणि ज्या नगरांत ते वसले होते त्यांत शोमरोनी लोकांनी उच्च स्थाने केली होती तेथील मंदिरांतून त्या ठेवल्या.


ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत; ते परमेश्वराचे भय बाळगत नाहीत; ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यांना इस्राएल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजांना परमेश्वराने विहित केलेले नियमशास्त्र व आज्ञा ह्यांप्रमाणेही चालत नाहीत.


परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.


कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.


प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन; तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन.


याकोबाच्या घराण्या, चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.


हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.


हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.


आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले;


म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्यांप्रमाणे वाग.


तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा;


आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan