Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:11
15 Iomraidhean Croise  

जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत.


कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;


तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे.


अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!


अरीएलावर उठलेल्या सर्व राष्ट्रांचा समुदाय, अरीएल व त्याचा दुर्ग ह्यांवर हल्ला करून त्याला पीडा देणारे सगळे स्वप्नासारखे रात्रीच्या आभासासारखे होतील.


त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?


तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस आणि यहूदाच्या वंशजांना नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नकोस; संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस.


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan