Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका, तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता आणि चांगल्या गोष्टी विकृत करता;

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:9
16 Iomraidhean Croise  

मग यहूदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, “तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बाथ दिवस पवित्र असा पाळत नाही, हे काय?


तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;


दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.


न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी, दुर्जन गुप्तपणे लाच घेतो.


दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.


दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.


त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


‘जो उपरा, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan