Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी तर याकोबाला त्याचा अपराध आणि इस्राएलास त्याचे पाप दाखवण्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:8
28 Iomraidhean Croise  

माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे. माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे.


“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;


पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


“मानवपुत्रा, यरुशलेमेची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे.


तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यांना त्यांच्या वडिलांची अमंगळ कृत्ये विदित कर.


“मानवपुत्रा, तू न्याय करशील ना? त्या खुनी नगरीचा न्याय करशील ना? त्या वेळी तिला तिची सर्व अमंगळ कृत्ये दाखव.


आणखी परमेश्वर मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा ह्यांचा न्याय करतोस ना? तर त्यांना त्यांची अमंगळ कृत्ये दाखव.


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


हे मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास हे मंदिर दाखव, म्हणजे ते आपल्या पातकांबद्दल लज्जित होतील व त्यांनी ह्या नमुनेदार इमारतीचे माप घ्यावे.


कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.


जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले;


तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्‍या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan