Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 “म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल, आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही, आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय! या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:6
14 Iomraidhean Croise  

आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.


“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan