Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:5
25 Iomraidhean Croise  

तोंड पाहून वागणे बरे नाही, चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील.


माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यांना पिडतात; स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवतात; त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत.


त्यांचे पूर्वज बआलदैवतामुळे माझे नाम विसरले, तसे ते आपली स्वप्ने एकमेकांना सांगून माझ्या लोकांना माझे नाम विसरायला लावतील अशी त्यांची कल्पना आहे.


परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


“तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.”


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.


तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.


राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan