Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांच्यावरचे कातडे सोलून काढतात, बहुगुण्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांची हाडे मोडून तुकडे-तुकडे करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांची कातडी सोलता आणि त्यांची हाडे मोडता, आणि पातेल्यात शिजविण्यासाठी मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:3
11 Iomraidhean Croise  

सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.


दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले.


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


ते म्हणतात, ‘घरे बांधण्याची वेळ अद्यापि जवळ आली नाही; हे नगर जणू काय कढई व आम्ही त्यातले मांस.’


मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक; तिच्यात निवडक हाडे भर.


जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका :


तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan