मीखाह 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.” Faic an caibideil |