Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील, आणि भारी विलाप करून म्हणतील: ‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे; परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे. त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला? त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 2:4
35 Iomraidhean Croise  

मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले;


यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,


त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे!


पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्‍यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो.


ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.


मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.


आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”


पाहा, म्हणी योजणारे सर्व ‘यथा माता तथा कन्या,’ ही म्हण तुझ्याविषयी म्हणतील.


तो त्याने माझ्यापुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्यांविषयीचा लेख होता.


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


तरुण स्त्री गोणपाट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते तसा शोक करा.


हे इस्राएलाच्या घराण्या, हे जे विलापवचन मी तुमच्याविरुद्ध उच्चारतो ते ऐका :


द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुमच्या मधून जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.


मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल.


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”


“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला,


बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे :


मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;


तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;


तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan