मीखाह 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
7 तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल; तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन; वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळवल्या म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपि होतील.
7 तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
7 तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”
हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो
अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.
तुमच्या सर्व वसतिस्थानांतील नगरे उद्ध्वस्त होतील व उच्च स्थाने उजाड होतील, अशाने तुमच्या वेद्या उद्ध्वस्त व उजाड होतील, तुमच्या मूर्ती भंगून नष्ट होतील, तुमच्या सूर्यमूर्ती तोडून टाकतील; अशी तुमच्या हातची कामे नाहीतशी करतील.
ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.
त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’
तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.
वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू घेऊन मी अग्नीत जाळले; नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणार्या ओढ्यात फेकून दिले.
कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”
‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’
दुसर्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.