Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:4
12 Iomraidhean Croise  

राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत;


परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले.


कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.


त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यांवरील सर्व रहिवासी थडथड उडतात.


पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्वपश्‍चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल.


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan