Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तू आपले डोके भादर, तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर, गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढव; कारण ती बंदिवान होऊन तुझ्यापासून गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:16
18 Iomraidhean Croise  

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले.


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्‍यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


कारण आमोस म्हणतो, ‘यराबाम तलवारीने मरेल, व इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने पकडून नेतील.”’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


तुला मुलगे व मुली होतील, पण ती तुला लाभणार नाहीत; कारण त्यांचा पाडाव होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan