Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 लाखीशाच्या रहिवासिणी, रथास वेगवान घोडे जोड; सीयोनकन्येच्या पापाचा आरंभ तिच्यापासून झाला; कारण इस्राएलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:13
27 Iomraidhean Croise  

त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्‍यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”


यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”


नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे.


यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला; पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले;


एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.


अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला, त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.


अदोरईम, लाखीश, अजेका,


ह्यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशासमोर तळ देऊन राहिला होता. त्याने आपले सेवक हिज्कीया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहूद्यांकडे पाठवले व त्यांना निरोप कळवला की,


त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्‍यातील जमीन कोळपील काय?


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.


तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके1 ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.


नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराबरोबर लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून राजाने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.


घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही.


तिची बहीण अहलीबा हिने हे पाहिले तरी तिच्यापेक्षाही तिची विषयासक्ती वाढली; तिने आपल्या बहिणीपेक्षा अधिक व्यभिचार केला.


याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएल घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?


मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठवला की,


लाखीश, बसकाथ व एग्लोन;


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan