Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण परमेश्वरापासून यरुशलेमेच्या वेशीवर संकट आले म्हणून मारोथाची रहिवासीण कल्याण होण्याच्या उत्कंठेने स्फुरण पावत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:12
9 Iomraidhean Croise  

मी सौख्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा विपत्ती आली; मी प्रकाशाची अपेक्षा करीत होतो तेव्हा अंधकार आला.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.


ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.


तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता; कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan