Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 शाफीरच्या (सुंदर नगराच्या) रहिवासिणी, नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो; सअनानाची रहिवासीण बाहेर निघाली नाही; बेथ-एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:11
12 Iomraidhean Croise  

कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्‍या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


पळा, आपला जीव वाचवा, वनातल्या झुडुपांसारखे व्हा.


मवाबास पंख द्या म्हणजे तो उडून निघून जाईल; त्याची नगरे उजाड होतील, त्यांत कोणी राहायचा नाही.


म्हणून पाहा, ज्यांना तू खूश केलेस, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे सर्व जार, त्यांना मी चोहोंकडून तुझ्याविरुद्ध जमा करीन, त्यांच्यापुढे तुझी लाज उघडी करीन म्हणजे ते तुझी सारी लाज पाहतील.


ते द्वेषाने तुझा समाचार घेतील, ते तुझी सर्व मालमत्ता हरण करून तुला नागवीउघडी करतील; अशाने तुझ्या शिंदळचाळ्यांची, तुझ्या कामासक्तीची व तुझ्या व्यभिचाराची लाज उघडी पडेल.


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवून देईन; राष्ट्रांना तुझी नग्नता दाखवीन, राज्यांना तुझी लाज दाखवीन.


तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्‍याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.


सनान व दहाशा व मिग्दल-गाद;


Lean sinn:

Sanasan


Sanasan