Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:1
27 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला.


परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला; तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्यायनिवाडा करत असे.


पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला.


इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी यहूदाचा राजा हिज्कीया बिन आहाज राज्य करू लागला.


आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.


हिज्कीया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने एकोणतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबीया, ती जखर्‍याची कन्या.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही.


एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :


“सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्‍चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो!


याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएल घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


हबक्कूक संदेष्ट्याला दृष्टान्ताने प्राप्त झालेले देववचन :


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan