Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जे अर्पण करावयाचे असते, ते कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 8:4
31 Iomraidhean Croise  

परमेश्वर आपल्या न्यायपरायणतेमुळे प्रसन्न झाला व आपल्या नियमशास्त्राची महती व थोरवी त्याने वाढवली.


आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला, तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याजकाला दाखवावा.


आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.


तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की, “मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.”


नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.’


येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले.


नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे.


माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.


तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”


तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.


तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.”


हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली, आणि तिला खायला देण्यास सांगितले.


आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. [मी तुम्हांला खचीत सांगतो की, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्यांना सोपे जाईल].”


तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले.


तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली.


नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’


त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.


ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल.


“तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.


मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”


तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.


मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली;


मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही.


जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.


मी स्वतःचा गौरव करू पाहत नाही; ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan