Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 7:2
19 Iomraidhean Croise  

ते राजाला म्हणाले, “ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निःपात व्हावा आणि इस्राएल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजले होते,


शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो; आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको.


डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.


कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील;


पुन्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल.


द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”


हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातापायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत; माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. यहूदा यरुशलेम व हेब्रोन हस्तगत करतो


तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला, निश्‍चल झाला; तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.


शमुवेल त्याला म्हणाला, “तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत, त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे तुकडे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan