Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 4:5
11 Iomraidhean Croise  

मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती, त्याची उंची एकशे वीस हात होती; शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढवली.


लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.


पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्‍याऐंशी होते.


ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.


नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की,


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan