Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 4:10
30 Iomraidhean Croise  

आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”


तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”


म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.


त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत.


परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”


पुन्हा एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले; त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला.


परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला.


नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले.


एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.


त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम; त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो.


तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन.


तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.


आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते.


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.


सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता.


ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”


तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला;


मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली;


आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे ते लवकर करून टाक.”


तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.


अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.


ह्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.


प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan