Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्यास्तव पश्‍चात्तापास योग्य असे फळ द्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पश्‍चात्तापाला अनुरूप असे वर्तन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 3:8
16 Iomraidhean Croise  

ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.


न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन.”


कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पस्तावा झाला नाही.


आता पश्‍चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan