Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 3:7
49 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.


ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.


परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.”


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?”


तेव्हा परूशी व सदूकी ह्यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता, ‘आम्हांला आकाशातून काही चिन्ह दाखवा,’ अशी त्याच्याकडे मागणी केली.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”


नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली.


पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्‍या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले,


त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले.


अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?


मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.


नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परूशी व हेरोदी ह्यांच्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले.


मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले,


मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.”


धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते.


परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.


परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.


ती पाठवलेली माणसे परूश्यांपैकी होती.


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”


तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.”


म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा.


ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.


तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले


वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.


तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.


आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.


तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan