Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्याच्याविषयी यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते: अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 3:3
8 Iomraidhean Croise  

घोषणा करणार्‍याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या ‘वाटा नीट करा.”’


‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”


आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील;


तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्‍याची वाणी’ मी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan