Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 हेरोद राजाच्या अमदानीत यहुदियातील बेथलेहेम नगरात येशूच्या जन्मानंतर, पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष यरुशलेम येथे येऊन विचारपूस करू लागले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 2:1
25 Iomraidhean Croise  

त्यांची वस्ती मेशापासून पूर्वेकडील डोंगर सफार ह्याकडे जाण्याच्या वाटेवर होती.


पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले.


सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.


तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले.


पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,


हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले;


ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की,


तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली;


यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते.


ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.


मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.”


‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?”


बेथलेहेम-यहूदा येथे यहूदा घराण्यातला एक तरुण लेवी उपरा म्हणून राहत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan