Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6-11 दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्‍लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 1:6
25 Iomraidhean Croise  

मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?”


दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो :


उरीया हित्ती, मिळून एकंदर सदतीस.


कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरीया हित्ती ह्याच्या प्रकरणाखेरीज तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही.


उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,


यरुशलेम येथे त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही : शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन,


सहावा ओसेम व सातवा दावीद हे पुत्र झाले;


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


त्याला यरुशलेमेत पुत्र झाले ते हे : शिमा, शोबाब, नाथान व शलमोन, हे चार अम्मीएलाची कन्या बथशूवा हिला झाले;


इशायाचा पुत्र दावीद ह्याच्या प्रार्थना समाप्त.


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय;


कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली;


ओबेदाला इशाय झाला, आणि इशायाला दावीद झाला.


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता.


शौलाने त्याला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र?” तेव्हा दावीद म्हणाला, “आपला दास बेथलेहेमकर इशाय ह्याचा मी पुत्र.”


म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही? आज माझ्या पुत्राने माझ्या नोकराला माझा घात करण्यासाठी टपून बसायला चिथावले असून मला कोणी कळवले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan