Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो, होय, जे दुष्टाई करतात ते वाढवले जातात, आणि ते देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 3:15
37 Iomraidhean Croise  

तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश ह्यांना बोलावणे पाठवून आणले.


ह्या सर्व प्रसंगांत ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.


लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवतात ते निर्भय राहतात, ते आपल्या हातालाच आपला देव समजतात.1


असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.


तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्‍यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.


कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.


रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.


अनीती करणार्‍या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.


तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,”


नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1


पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात.


कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.


त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली.


पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले.


तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले, व त्याचे निर्बंध पाळले नाहीत,


तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले;


दुष्ट लोकांना मिळणार्‍या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते.


पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते : असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.”


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला.


पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या नवर्‍याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.”


त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये.


तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan