Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुम्ही म्हणालात, ‘देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो ह्यांपासून लाभ काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुम्ही म्हणालात “परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे; आम्ही त्याचे आज्ञापालन केले, आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो याचा काय लाभ झाला?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 3:14
16 Iomraidhean Croise  

ते देवाला म्हणाले, ‘तू आमच्यापासून दूर हो; सर्वसमर्थ आमचे1 काय करणार?’


तो म्हणतो ‘देवाशी सख्य ठेवून मनुष्याला काय लाभ होतो?’


ह्यास्तव तू म्हणतोस की ‘तुला1 काय लाभ होणार? मी पाप केले असते तर माझे काय कमी झाले असते?’


हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला.


‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.


तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’


आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’


पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले तेव्हापासून आम्हांला सर्व गोष्टींची वाण पडली, आणि तलवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे.”


ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्‍या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे; तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो?’


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan