Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्‍यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावेन, मग तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेलींचे फळ अकाली गळणार नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 3:11
15 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन; द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील; पानेही वाळून जातील; म्हणून जे काही मी त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल.”


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;


द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.


कुरतडणार्‍या टोळांपासून जे राहिले ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणार्‍या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणार्‍या टोळांनी खाल्ले; चाटून खाणार्‍या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.


त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे; माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत; सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे; आणि त्याच्या फांद्या पांढर्‍या झाल्या आहेत.


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्त्व देत आहेत.


मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.


“तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडन केले; तुमच्या बागा, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतून झाडे, कुरतडणार्‍या टोळांनी खाऊन टाकली; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”


मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो.


शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.


तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan